अमेरिकेतील दूतावास आणि भारतातील त्यांचे वाणिज्य दूतावास यावर्षी भारतीयांना “विक्रमी” व्हिसा उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहेत. जवळपास प्रत्येक व्हिसाच्या श्रेणीतील विलंब आणि अनुशेष लक्षात घेऊन दूतावासाने हा निर्णय घेतला आहे. सध्या वर्क व्हिसासाठी अर्ज करणार्या भारतीयांची प्रतीक्षा वेळ ६०-२८० दिवसांच्या दरम्यान आहे. तर प्रवाशांसाठी तो दीड वर्षाचा प्रतीक्षा कालावधी आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अनेक प्रसंगी व्हिसा विलंबाचा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे. यासोबतच मंत्रालयाने सर्व श्रेणीतील भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा सहज उपलब्ध होण्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. दूतावासाने गेल्या वर्षी १ लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिसा देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीयांसाठी ही विक्रमी संख्या आहे. यावर्षी आणखी जास्त भारतीय विद्यार्थी स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करतील अशी अपेक्षा मुंबईतील कॉन्सुलर प्रमुख जॉन बॅलार्ड यांनी व्यक्त केली आहे.
जॉन बॅलार्ड म्हणाले की, गेल्या वर्षीही कोविडच्या काळात आम्ही एकूण ८ लाखांहून अधिक व्हिसा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आता कोविदचे प्रमाण घातले आहे. त्यामुळे २०२३ साली आपण हा आकडाही पार करू अशी आशा आहे. दूतावास प्रथमच बी १ आणि बी २ पर्यटक आणि व्यावसायिक प्रवास व्हिसाच्या श्रेणींचा अनुशेष कमी करण्याचा विचार करत आहे.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
अलीकडेच देशभरात२.५ लाख बी १ / बी २ व्हिसा अपॉइंटमेंट उघडल्या आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना जगभरातील दूतावास आणि वॉशिंग्टन येथून बोलावण्यात आले आहे. ते आम्हाला विशेषत: प्रथमच बी १ / बी २ अर्जदारांच्या मुलाखती घेण्यास मदत करतील. तसेच व्हिसाच्या नूतनीकरणासाठी, अर्जदार आता त्यांचा अर्ज ई-मेलद्वारे पाठवू शकतात असे बॅलार्ड यांनी सांगितले