अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू

अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू

इराकची राजधानी बगदादमध्ये बुधवारी अमेरिकी ड्रोनने हल्ला केला. यात इराणसमर्थक दहशतवादी गट कताइब हिजबुल्लाहच्या मुख्य कमांडरसह तिघांचा मृत्यू झाला. अमेरिकी ड्रोनने बगदादच्या पूर्वेकडील भागातील मश्गद परिसरात मुख्य मार्गावर ज्या गाडीला लक्ष्य केले, त्यात हे तिघे प्रवास करत होते. आपत्कालीन मदत पथक तिथे पोहोचेपर्यंत ही गाडी जळून खाक झाली होती.

ड्रोनने हल्ला करताच गाडी जळून खाक झाली. तोपर्यंत अपघातस्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात विसाम मोहम्मद अबू बक्र अल-सादी याचा मृत्यू झाला आहे. तो सिरियात कताइब हिजबुल्लाहच्या ऑपरेशनचा प्रभारी कमांडर होता.

जॉर्डन येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने आक्रमक रूप धारण केले आहे. अमेरिकेने गेल्याच आठवड्यात इराक आणि सिरियात इराणसमर्थक दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव केला होता. त्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. त्या दिवसापासून या भागात तणावाची परिस्थिती असताना अमेरिकेने पुन्हा एकदा ड्रोनहल्ला केला आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांकडून खासदार साकेत गोखले यांच्या दाव्याची पोलखोल!

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पंजाबचा रहिवासी ठार!

एनडीएचे घटकपक्ष वाढवण्यात भाजपचा पुढाकार!

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकारी याच्याविरुद्ध लाचेचा गुन्हा दाखल

अमेरिकेने जॉर्डनमधील लष्करी तळावरील हल्ल्याला इराकच्या इस्लामिक रेझिस्टन्सला जबाबदार ठरवले आहे. आता अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात मारला गेलेला कमांडर इस्लामिक रेझिस्टन्स संघटनेचा म्होरक्या होता. इस्लामिक रेझिस्टन्सने इस्रायल-हमास युद्धानंतर इराकमधील अमेरिकी सैनिकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Exit mobile version