अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी भारत दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. काल (१९ मार्च) पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही भेटले. भारतात आगमन झाल्यावर लगेचच त्यांनी, भारतात आल्याबद्दल उत्सुकता दर्शवली होती. भारत आणि अमेरिकेचे संबंध सुदृढ करण्याचा निश्चयही त्यांनी दर्शवला होता.

भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध गेली दोन दशके आणि विशेष करून गेली ६-७ वर्षे अधिकाधिक दृढ होत आहेत. दोन्ही देशांमधील लष्करी करार आणि लष्करी अभ्यासही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतात येणे ही महत्वाची घडामोड आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या कारकिर्दीतील नवनियुक्त संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या पहिल्याच परदेश दौऱ्यात भारताचा समावेश केल्याने एक मोठा संदेश जगाला आणि मुख्य म्हणजे चीनला जात आहे. पहिल्या दौऱ्यात दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांचा समावेश त्यांनी केला आहे. यातील दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया ही त्यांची ‘करारबद्ध मित्र राष्ट्र’ आहेत. भारत हा ‘करारबद्ध मित्र राष्ट्र’ नसून केवळ मित्र राष्ट्र आहे.

हे ही वाचा:

एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात

महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लॉईड ऑस्टिन यांच्या स्वागतासाठी ट्विट करून, भारत आणि अमेरिका हे देश त्यांच्या सामरिक मैत्रीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. याबरोबरच ही मैत्री जगाच्या कल्याणासाठी असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी जो बायडन यांना शुभेच्छाही दिल्या.

Exit mobile version