25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाखलिस्तानी गुरुपतवंत पन्नू प्रकरणी रशिया भारताच्या पाठीशी

खलिस्तानी गुरुपतवंत पन्नू प्रकरणी रशिया भारताच्या पाठीशी

अमेरिकेवर साधला निशाणा

Google News Follow

Related

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश अशी ओळख असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाचं आता रशियाने मोठा दावा केला आहे. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान भारताला अस्थिर करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे, असा दावाही रशियाने केला आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेने हाणून पाडला होता. अमेरिकन सरकारने या कटात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. मात्र, या संदर्भात कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नव्हते. अशातच रशियाची सरकारी न्यूज एजन्सी ‘आरटी न्यूज’नुसार, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, अमेरिका भारताच्या राजकीय परिस्थितीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भारताची राजकीय समज आणि इतिहास कळत नाही. भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर अमेरिकेच्या अहवालाच्या संदर्भात झाखारोवा यांनी हे विधान केले आहे.

अमेरिका भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहे. भारतातील अंतर्गत राजकीय परिस्थिती बिघडवणे आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करणे हे त्याचे कारण आहे. झाखारोवा म्हणाल्या की, अमेरिकेच्या कारवाया भारताच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप स्पष्टपणे दर्शवतात, जे भारताचा अपमान करतात.

हे ही वाचा:

‘पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये सापडले ८ कोटी’

एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

“पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध”

करकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपाबाबत विधान करताना सांगितले की, या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सहभागाबाबत अमेरिकेने अद्याप कोणतेही विश्वसनीय पुरावे दिलेले नाहीत. अमेरिका भारतावर सातत्याने खोटे आरोप करत आहे. त्याला भारताचा इतिहास कळत नाही. यामुळे ते भारतावर धार्मिक स्वातंत्र्याबाबत सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा