एकीकडे हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने सीरियातील इराणी सैन्याच्या केंद्रांवर हल्ला केला. अमेरिकेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि त्याला पाठिंबा देत असलेल्या दोन ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते केंद्र उध्वस्त केले. इराक आणि सीरियात अमेरिकन सैनिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यानंतर हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेने सांगितले.
अमेरिकेने यापूर्वी इराणचा पाठिंबा असलेले काही सशस्त्र गट अमेरिकन सैनिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी म्हणाले होते की, “अमेरिकेला कोणताही संघर्ष नको आहे. मात्र, इराणचा पाठिंबा असलेल्या गटांकडून अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले होत आहे. ते अस्वीकार आहे आणि ते थांबवले पाहिजेत.”
“अमेरिकन सैन्यावर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचा असलेला सहभाग ते लपवू इच्छित आहे. मात्र, आम्ही त्यांना सोडणार नाही. जर इराणचा पाठिंबा असलेल्या या गटांकडून हल्ला होत राहिला, तर आम्ही आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पुढील पाऊल उचलण्यासाठी संकोच करणार नाही,” असा इशारा ऑस्टिन यांनी दिला होता.
हे ही वाचा:
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने या हल्ल्यांचा इस्रायल- हमास युद्धाशी संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ऑस्टिन म्हणाले, “अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ला करणारे गट वेगळे आहेत. तसेच सध्या चालू असलेल्या इस्रायल हमास युद्धाशी त्याचा संबंध नाही. यामुळे अमेरिकेची इस्रायल-हमास युद्धावरील भूमिका बदलणार नाही.”