अमेरिकेने एक धक्क्दायक कबुली दिली. काबुलमधील ड्रोन हल्ल्यात दहशतवादी नाही दहा नागरिक ठार झाल्याचे अमेरिकेने सांगितले. या मानवी चुकीसाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने माफी मागितली.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर काबुल विमानतळाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात अमेरिकेचे सैनिक ठार झाले. या घटनेनंतर पुढील काही तासांत अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात दहशतवादी नाही तर नागरिक ठार झाले होते. या चुकीची कबुली अमेरिकेने अफगाणिस्तानमधून स्वतःच्या सैनिकांना मायदेशी आणल्यानंतर दिली.
अमेरिकेच्या हल्ल्यात एका कुटुंबातील दहा जण ठार झाले. या चुकीसाठी माफी मागत अमेरिकेने दुर्दैवी घटनेसाठी शोक व्यक्त केला. ज्या कुटुंबातील सदस्य ठार झाले त्यांच्या नातलगांना अमेरिकेकडून भरपाई दिली जाणार असल्याचे पेंटागॉनने सांगितले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले
बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली
जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला
…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
अमेरिकेच्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या आणि अफगाणिस्तानातून लष्करी माघार घेण्याच्या अंतिम गोंधळलेल्या दिवसांमध्ये विमानतळाजवळ २९ ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला. लष्कराने त्यावेळी दावा केला होता की, या हल्ल्यामुळे “एक आत्मघातकी हल्लेखोरांना” हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करण्यापासून रोखले गेले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात ‘आयएसआयएस-के’ला लक्ष्य केला होता.
या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर. पेंटागॉननेही नागरिकांच्या जीवितहानीची शक्यता मान्य केली.