चीनच्या विस्तारवादाला अमेरिकेचा काटशह?

चीनच्या विस्तारवादाला अमेरिकेचा काटशह?

चीन- तैवान तणावामुळे अमेरिकेच्या युएसएस थिओडोर रुझवेल्ट या विमानवाहू नौकेच्या नेतृत्वात काही नौका दक्षिण चीन समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे.

सागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ युएसएस थिओडोर रुझवेल्टच्या नेतृत्वात अमेरिकेच्या नौदलाच्या काही विमानवाहू नौकांचा समूह दक्षिण चीन समुद्रात दाखल झाला आहे. चीन आणि तैवान यांच्यातील वाढत्या तणावावर वॉशिंग्टनने चिंता व्यक्त केली आहे.

रविवार २४ जानेवारी रोजी तैवानने आपल्या हवाई हद्दीत शिरलेल्या चीनी विमानांमुळे काळजी व्यक्त केली होती. ही विमाने प्रातास बेटांच्या आसमंतात दिसली होती. त्याच दिवशी अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या काही लढाऊ नौका दक्षिण चीन सागरात दाखल झाल्या.

दक्षिण चीन सागरावराच्या बऱ्याच मोठ्या भागावर चीन सातत्याने आपला दावा सांगत आला आहे. याच भागात अमेरिकेच्या लढाऊ नौकांचा ताफा नेहमीच्या सामान्य गस्तसाठी आल्या होत्या. असे अमेरिकेच्या सैन्य दलाकडून सांगण्यात आले.

रिअल ऍडमिरल डॉउग वेरिस्सिमो यांनी सांगितले की, तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा सामान्य कवायतींसाठी आणि सागरावरील स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी दक्षिण चीन सागरात येण्याने आनंदच झाला आहे.

दक्षिण चीन सागर व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. जगातील एकूण व्यापाराच्या दोन तृतीयांश व्यापार या समुद्रातून चालतो.

चीन लोकशाहीमार्गाने राज्य चालवणाऱ्या तैवानवर सातत्याने आपला दावा सांगत आला आहे. त्याबरोबरच मागील काही महिन्यांपासून चीनच्या या तैवान बेटाजवळील सैनिकी हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे इतर राष्ट्रांप्रमाणेच तैवानशी कोणतेही थेट कूटनैतिक संबंध नाहीत, परंतू ती तैवानला सुरक्षा पुरवण्याच्या कराराने बांधलेली आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी सोहळा बुधवारी संपन्न झाला. तैवानच्या सुरक्षेबाबत ते वचनबद्ध आहेत असे, बायडन यांनी सांगितले

Exit mobile version