दुबईमध्ये काम करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठी लॉटरी लागली आहे. फास्ट- ५चा पहिला विजेता ठरल्यानंतर त्याला पुढील २५ वर्षे महिन्याला किमान साडेपाच लाख रुपये मिळणार आहेत. गल्फ न्यूजने हे वृत्त दिले आहे. कंपनीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील मोहम्मद आदिल हा तरुण फास्ट ५चा मेगा पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
दुबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे इंटिरिअर डिझाईन सल्लागार म्हणून काम करणारा आदिल खान याला लॉटरी जिंकल्यानंतर तब्बल २५ वर्षे दर महिना २५ हजार दिरॅम ( पाच लाख ५९ हजार रुपये) मिळणार आहेत. लॉटरी लागल्यामुळे आदिल खूप खूष आहे. ‘ मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. करोना साथीमध्ये माझ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे मीच संपूर्ण कुटुंब सांभाळतो आहे. माझ्या कुटुंबात आई-वडील आणि एक मुलगी आहे. त्यामुळे योग्य वेळीच ही लॉटरी मला लागली आहे.
हे ही वाचा:
दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार
मणिपूरचा राग नाशिकमध्ये, १० पोलिस दगडफेकीत जखमी !
अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही
‘मणिपूरमधील संघर्षात परकीयांचा हात असू शकतो’
लॉटरी लागल्याचे कळताच मला खरे तर विश्वासच बसला नाही. हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच होते. मी हे माझ्या कुटुंबीयांना सांगितले तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा मला खातरजमा करण्यास सांगितले,’ असे आदिल खान म्हणाला.
तर, मेगा पुरस्कार एमिरेट्स ड्रॉचे आयोजक टायचेरोसचे मार्केटिंग प्रमुख चॅडर यांनी सांगितले की, ही लॉटरी दाखल केल्यानंतर आठ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आम्ही फास्ट ५साठी पहिल्या विजेत्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही याला फास्ट फाइव्ह यासाठी म्हणतो की, हा कोट्यधीश बनण्याचा सर्वांत योग्य मार्ग आहे. याच्या विजेत्याला आम्ही पुढील २५ वर्षे नियमित पैसे देणार आहोत.