जोशीमठ येथील दोन हॉटेल्स पडणार, शंभरहून अधिक घरे रिकामी करणार

जोशीमठ मध्ये असुरक्षित क्षेत्रे रिकामी करणार

जोशीमठ येथील दोन हॉटेल्स पडणार, शंभरहून अधिक घरे रिकामी करणार

आजपासून जोशीमठ मध्ये दोन हॉटेल्स ‘माउंट व्ह्यू’ आणि ‘मलारी इन’ त्वरित पाडण्याची कारवाई करणार आहेत. भूस्खलन आणि भेगा पडल्यामुळे रहिवाशांना धोका निर्माण झाल्यामुळे हे हॉटेल्स पाडण्यात येणार आहेत. याशिवाय याच परिसरातील डझनभर घरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.जोशीमठ मध्ये असुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेली असुरक्षित क्षेत्र  रिकामी करणार आहेत.

 

काल मुख्य सचिव डॉ. एस एस संधू यांच्या उपस्थितीत जोशीमठ भूस्खलनाबाबत शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक झाली. यापुढे रोज दुपारी बारा वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जोशीमठ मध्ये सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला जाईल असे आप्पती “सचिव रणजित सिन्हा” यांनी सांगितले. याशिवाय यूपीसीएल आणि पिटकूलला अनेक कार्यकर्त्यांचे संघ जोशीमठला पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांत भेगा वाढल्यामुळे बचावकार्य आणि आपत्तीनिवारण सरकार आणि प्रशासन उच्च स्तरावर काम करत आहेत.

विस्थापित लोकांचे विस्थापन तीन वेगळ्या टप्प्यात करणार असून, तिथली परिस्थिती बघता पिपळकोटी, हर्बल इन्स्टिटयूट या ठिकाणी तिथल्या जमिनींचे चिन्हांकन करणे चालू आहे. आत्तापर्यंत एकूण ६८ कुटुंबाना कायमस्वरूपी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बचाव कार्यासोबतच सर्वेक्षणाचे कामसुद्धा उच्च पातळीवर सुरु आहे असे आपत्तीसचिव सिन्हा यांनी सांगितले. तर आयआयटी रुरकी जिओटेक्निकल या जागांचा अभ्यास करणार आहेत. वाडिया इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडून भूकंपाची जलविज्ञान चाचणी घेण्यात येणार असून त्याचा अहवालही महिनाभरात अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!

घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

जोशीमठ आणि आजूबाजूचा परिसर यासाठीच्या योजना

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन

जोशीमठ मदत कार्यासाठी समिती स्थापन

भेगा पडलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरु

जी एस आय सह इतर संस्थांबरोबर सहकार्य घेणार

पाटबंधारे विभागाचे टेंडर आता १३ तारखेला निघणार पूर्वी २० तारखेला उघडायचे. आतापर्यंत ५३ बाधित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये निधी तर गरजेनुसार धान्य आणि ब्लँकेट्स देण्यात आले आहेत. याशिवाय ५० बाधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी चर्चा करून केंद्रीय पथक येथे पोचले आहे. याबाबत राज्यसरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. सविस्तर मदत पॅकेज तैयार करून केंद्राला पाठवले जाईल.

Exit mobile version