28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियासंयुक्त राष्ट्रसंघाने ‘योग’च्या टीकाकारांना फटकारले

संयुक्त राष्ट्रसंघाने ‘योग’च्या टीकाकारांना फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसाराचे समर्थन

Google News Follow

Related

मोदी सरकार जागतिकस्तरावर योगप्रसारासह भारतातील विभाजनकारी अजेंडा राबवत असल्याचा आरोप करणार्‍या टीकाकारांना संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी फटकारले. ‘योगमधून आपली सामान्य मानवता प्रकट होते. आमच्यातील मतभेद असूनही, आपण एक आहोत, हे योगसाधनेतून आपल्याला कळते,’ असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

म्हणूनच की काय, भारत ही योगसाधनेची जन्मभूमी असली तरी अमेरिकेमध्ये योगसाधनेने व्यावसायिक रूप धारण केले आहे. अमेरिकेमध्ये कोणत्याही देशापेक्षा दरडोई अधिक योग केंद्रे आहेत. अमेरिकेत सात हजारांहून अधिक योग केंद्रे आहेत. ‘योग ही मन:शांती देते. योगसाधनेमुळे अस्वस्थता कमी होऊन मानसिक स्वास्थ्य लाभते. त्यामुळे शिस्त लागण्यास मदत होते. धैर्य मिळते. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपली एकता आणखी बळकट करूया,’ असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गटर्स यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे म्हटले आहे.

अमेरिकी नागरिक योगवर्ग, योगसाधनेला साजेसे कपडे, साहित्य आणि अन्य साधनांसाठी प्रत्येक वर्षी १६ अब्ज डॉलर खर्च करतात. योग जर्नलनुसार, ३.६ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के) अमेरिकेत योगसाधना करतात. स्वामी विवेकानंद यांनी सर्वांत प्रथम १८८३मध्ये योगसाधनेची ओळख अमेरिकनांना करून दिली. त्यानंतर योगगुरू परमहंस योगानंद यांनी योगसाधनेचा प्रसार केला. व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदा आमंत्रण मिळण्याचा मान त्यांच्याकडे जातो.   सन १९२७मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष केल्व्हिन कुलिज यांनी योगगुरू परमहंस योगानंद यांना आमंत्रित केले होते. तर, भारताचे बीकेएस अय्यंगार आणि पत्ताभी जॉइस या योगगुरूंचे शिष्य अमेरिकतही आहेत. अमेरिकेत त्याचे विविध प्रकारही आले आहेत. उदा. हॉट योगा, यिन योग, योगा लाइट इत्यादी योगप्रकारही तिथे लोकप्रिय आहेत.

हे ही वाचा:

योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!

योगदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतून संदेश

मेकअप आर्टिस्टचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, हत्येचा संशय

केवळ पैशासाठी मित्राच्या आईला मारणाऱ्यांना जन्मठेप

योगसाधना करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. सन २०१२च्या तुलनेत योगसाधना करणाऱ्यांमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. तेव्हा केवळ दोन कोटी लोक योगसाधना करत. सरासरी पाहिल्यास तीनपैकी एका अमेरिकी नागरिकाने किमान एकदा तरी योगसाधना केली आहे. गेल्या चार वर्षांत योगसाधना शिकवणाऱ्यांमध्येही तिपटीने वाढ झाली आहे. यातील बहुतेक ७२ टक्के या महिला आहेत. ‘दुसऱ्या देशाची संस्कृती आणि वारसा इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला जाण्याचे यांसारखे दुसरे उदाहरण सापडणे कठीण आहे. योगसाधनेमुळे भारताचा जीवनमार्ग निश्चितच लोकप्रिय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत रुचिरा कंबोज यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा