उत्तर मध्य नायजेरियात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात ५० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. बेन्यू राज्यातील उमोगिडी गावात ही घटना घडली. याच जागी त्याआधी तीन जणांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून मार्केटमध्ये या बंदुकधाऱ्याने गोळीबार केला. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार ८ लोकांचा मृत्यू या घटनेत झाला.
या गोळीबारामागील कारण समजू शकले नसले तरी ४७ मृत्यू आणि त्याआधी झालेल्या ३ जणांची हत्या याचा एकमेकांशी संबंध आहे. सध्या या हत्याकांडाची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यात असलेला वाद यासाठी कारणीभूत आहे, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर
भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!
पारीख समिती असे काय म्हणते की, घरगुती गॅसच्या किमती येतील खाली!
तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक
मेंढपाळांनी आपल्या मेंढ्या चरायला पाठविल्यामुळे आपल्या शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६५मध्ये जो कायदा आला त्यानुसार या जमिनी चरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असा मेंढपाळांचा दावा आहे.
बेन्यू या राज्याला नायजेरियाचे फूड बास्केट म्हणून ओळखले जाते. जिथे मोठ्या प्रमाणावर शेती आहे. तिथेच मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे बेन्यू राज्यातील शेती उत्पादनांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे तेथील गरीब जनतेची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे.