उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) आज एका उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. हा उपग्रह भूस्थिर कक्षेत प्रस्थापित केला जाणार होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे इस्रोला हा उपग्रह ठराविक कक्षेत प्रस्थापित करण्यास दुर्दैवाने अपयश आले आहे.

इस्रोने आज सकाळी ५ वाजून ४३ मिनीटांनी एका मोहिमेद्वारे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित करायचे ठरवले होते. त्यानुसार जीएसएलव्ही-एफ१० या मोहिमेद्वारे जीएसएलव्हीने उड्डाण देखील केले. प्रथम दोन टप्पे सुयोग्य रितीने पार पडल्याने मोहिम यशस्वी झाली असे वाटले होते. परंतु थोडा वेळाने तिसरा टप्पा प्रज्वलित झाला नसल्याचे शास्त्रज्ञांच्या ध्यानात आले. त्यामुळे हा उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यास यश आले नाही.

हे ही वाचा:

अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

जीएसएलव्हीचा तिसरा टप्पा क्रायोजेनिक इंजिनचा होता. काही तांत्रिक अडचणींमुळे या तिसऱ्या टप्प्याचे प्रज्वलन होऊ शकले नाही. रॉकेटच्या पहिल्या दोन टप्प्यांनी मात्र अपेक्षित कामगिरी करून दाखवली होती. इस्रोच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट करण्यात आली आहे.

केंद्रिय अवकाश मंत्री जितेंद्र सिंग यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटनुसार या घटनेनंतर त्यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दोन टप्पे बरोबर रितीने कार्यरत झाले, त्यानंतर वरच्या क्रायोजेनिक टप्प्यात काही अडचण उद्भवली. ही मोहिम पुन्हा एकदा आखली जाऊ शकते.

सुमारे चार मीटर व्यासाचा हा उपग्रह होता. जीसॅट-१ या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ही मोहिम आखली गेली होती. हा उपग्रह भूस्थिर प्रकारचा होता. या मोहिमेसाठी २६ तासांची उलटी कालगणना चालू करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ५१.७० मीटर उंचीच्या जीएसएलव्ही रॉकेटने आज सकाळी बरोबर ५ वाजून ४३ मिनीटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या लाँचपॅडवरून भरारी घेतली होती. पहिल्या दोन यशस्वी टप्प्यानंतर तिसऱ्या क्रायोजेनिक टप्प्यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने ही मोहिम दुर्दैवाने यशस्वी होऊ शकली नाही.

Exit mobile version