UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश

UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश

बुधवार १५ डिसेंबरचा दिवस भारतासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला. संयुक्त राष्ट्राची शैक्षिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोने पश्चिम बंगालमधील पारंपारिक दुर्गा पूजा उत्सवाला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या समवेत सबंध भारतीयांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण मानला जात आहे. युनेस्कोच्या या निर्णयाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पश्चिम बंगालमधील दुर्गा पुजा उत्सव हा भारतात आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या काही पारंपारिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरातून मोठ्या प्रमाणात लोक दुर्गा पुजा पाहण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये येत असतात. भारताच्या या सांस्कृतिक ठेव्याची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव

ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

दिवसाला बँक फसवणुकीच्या २२९ घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रत्येक भारतीयासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलकत्त्याची दुर्गापूजा हा एक असा अनुभव आहे जो प्रत्येकाने घ्यायलाच हवा असे देखील ते म्हणाले. तर दुर्गा पूजा उत्सवातून आपली संस्कृती आणि परंपरा अधोरेखित होते असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुर्गापूजा उत्सवातून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि एकात्मतेची भावना दिसून येते असे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे. युनेस्कोच्या या निर्णयाने प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

२००८ सालापासून युनेस्को तर्फे जगभरातील सांस्कृतिक वारसा आणि ठेवा अधोरेखित करणारी सांस्कृतिक वारशाची सूची प्रसिद्ध केली जाते. त्यामागचा मूळ उद्देश जगभरातील अनोखा सांस्कृतिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचवणे हा असतो.

Exit mobile version