एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा

इस्रायली सैन्याकडून ग्राऊंड ऑपरेशन सुरु होणार

एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा

इस्रायल विरुद्ध हमास असा संघर्ष पेटला असून हे युद्ध आता विकोपाला गेले आहे. हमासने केलेल्या हल्ल्याला इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. हे युद्ध पेटलेलं असताना आता इस्रायली लष्कर आणि रणगाडे गाझा बॉर्डरजवळ पोहोचले आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्याकडून ग्राऊंड ऑपरेशन सुरु होऊ शकतं, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

हमास दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्याचा इस्रायलचा मानस असून त्यासाठी इस्रायली लष्कराच्या १ लाख सैनिकांनी गाझाला वेढा घातला आहे. मोहीम फत्ते करण्यासाठी इस्रायली रणगाडे गाझाच्या दिशेने वेगाने सरकू लागले आहेत. इस्रायली सैनिक हे आता फक्त सरकारच्या आदेशाची वाट बघत असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने हमासला २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून २४ तासांत गाझा सोडण्यास सांगितले आहे.

 

सध्या पाश्चिमात्य देश इस्रायलला पाठिंबा देत असून युद्धासाठी मदतही करत आहेत. अमेरिकाही इस्रायलच्या बाजूने मैदानात उतरला आहे. इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना दक्षिणेकडील भागाकडे स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. तो भाग इजिप्तची सीमा असून तुलनेने सुरक्षित मानला जातो. त्यामुळे सामान्य नागरिकांनी तिकडे आसरा घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

गाझामध्ये हमासचे जेथे जेथे तळ आहेत, ते नष्ट केले जातील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. त्यासाठीच इस्रायली संरक्षण दलाने गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडे जाण्याचे आवाहन केले आहे. आठ दिवसांनंतरही दोन्ही गटांमध्ये अजूनही हिंसक संघर्ष सुरु आहे. इस्राइलने केलेल्या दाव्यानुसार १ हजार २०० पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, २ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासचे जवळपास एक हजार नागरिक मारले गेल्याची माहिती आहे.

Exit mobile version