रशिया युक्रेन युद्धाचा आजचा नववा दिवस आहे. रशियाकडून हल्ल्याची तीव्रता वाढत चालली आहे. युक्रेनही रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे रशियाने जगातील सर्वात मोठे विमान मरियाला (AN-225 Mriya) नेस्तनाबूत केले होते. तर आज या हल्ल्यात जगातले युक्रेनचे सर्वात मोठे मालवाहू विमान जळून खाक झाले आहे.
रशिया युक्रेन हल्ल्यात जगातील सर्वात मोठे युक्रेनने तयार केलेले विमान उद्धवस्त झाले आहे. ‘अँटोनॉव्ह- २२५ म्रीया’ असं या मालवाहू विमानाचे नाव होते. कीव जवळच्या होस्टमेल विमानतळावर रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हे विमान जळून खाक झाले आहे. आज रशियन सैन्याने युक्रेनच्या अणुप्रकल्पावरही हल्ला केला आहे. या अणुप्रकल्पात एकूण सहा अणुभट्ट्या आहेत. हा युक्रेनचा अणुप्रकल्प जगातील सर्वात मोठा नववा अणुप्रकल्प आहे.
रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनची अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. रशियन सैन्याने आता युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरही हल्ला करायला सुरवात केली आहे. तर कीवमधील ऑइल डेपोवर रशियन सैन्याने हल्ला चढवला आहे. रशियाने आज केलेल्या उत्तर युक्रेन हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
शतकांच्या कसोटी यज्ञांतून उठली विराट ज्वाला
सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा
‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’
दरम्यान युक्रेनच्या खारकीव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी १३० रशियन बसेस तयार असल्याची माहिती रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भारतात पोहोचण्यास मदत होणार आहे.