गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्हीकडून हल्ले होत असून युद्ध शमण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. अशातच रशियन सैन्याला या युद्धात महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे. रशियाने युक्रेनचे एक शहर ताब्यात घेतले आहे. युक्रेनचे अवदिवका शहर ताब्यात घेण्यात रशियाला यश आले आहे.
रशियन सैन्याने अवदिवका शहर ताब्यात घेतले असून सध्या हे शहर पूर्णपणे उध्वस्त अशा परिस्थितीत आहे. बाखमुतपेक्षाही अवदिवकाची भीषण स्थिती असून बाखमुतपेक्षाही मोठा संहार इथे झाल्याचे चित्र आहे. युक्रेनने अवदिवकामधून त्यांचे सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे नवीन सैन्य प्रमुख जनरल सिरीस्की यांनी ही घोषणा केली आहे. मे २०२३ मध्ये रशियन सैन्याने बाखमुतवर ताबा मिळविला होता त्यानंतर रशियन सैन्याला मिळालेला हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.
या शहराला रशियन सैन्याने तिन्ही बाजूंनी घेरुन युक्रेनी सैन्यावर हल्ला केला. त्यामुळे युक्रेनी सैन्याला रसद मिळण बंद झालं. शस्त्रास्त्रांची कमतरता आणि रशियाच्या आक्रमक हल्ल्याने युक्रेनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं. आता युक्रेनी सैन्य माघारी फिरलं आहे. युद्धात पराभव टाळण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो देशांकडे लवकरात लवकर शस्त्र पुरवठ्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!
अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे
अवदिवका शहर हे रशियासाठी खूप महत्त्वाचे आहे. अवदिवकामधून डोनेस्कमध्ये जाता येते. रशियाच्या ताब्यात असलेलं डोनेस्क आणि अवदिवकामध्ये फक्त १५ किलोमीटरचे अंतर आहे. डोनबास हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे असून डोनबासवर ताबा मिळवण्यासाठी अवदिवकावर कब्जा करणं आवश्यक होता. अवदिवकामध्ये युक्रेनने बंकर्सच जाळ उभारलं होतं. या बंकरमुळेचं युक्रेनी सैन्य रशियन सैन्यासमोर पाच महिने टिकाव धरु शकलं.