युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्ध २०२२ पासून सुरू आहे. हे युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून युद्धाला आणखी तीव्र वळण मिळताना दिसत आहे. रशिया युक्रेनवर लवकरच ताबा मिळवेल हा अंदाज फोल ठरला असून युक्रेन पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा युक्रेनने रशियाचे मोठे नुकसान केले आहे.

युक्रेनने रशियाची एक युद्धनौका नष्ट केली आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाजवळ एका स्पेशल मिशनमध्ये रशियन युद्धनौका बुडवण्यात आली. युक्रेनने ब्लॅक सी मध्ये ही मोहीम पार पाडली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. यात कथित रशियन युद्धनौका बुडताना दिसत आहे.

युक्रेन सैन्याच्या एका स्पेशल युनिटने मिसाईल कार्वेट इवानोवेट्स नष्ट केली आहे, असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे. यूक्रेनच्या स्पेशल युनिट ग्रुपच्या १३ सैनिकांनी ब्लॅक सी मध्ये तैनात असलेल्या रशियाच्या ताफ्यातील मिसाइल कार्वेट इवानोवेट्सला नष्ट केले. या युद्धनौकेची किंमत ६ ते ७ कोटी डॉलर इतकी होती, असा अंदाज आहे. युक्रेनने व्हिडिओ पोस्ट करुन याची जबाबदारी स्वीकारली आहे. माहितीनुसार, रशियन युद्धनौका क्रिमिया जवळच्या डोनुजलाव भागात काळ्या सागरात गस्तीवर होती. तिथे हा हल्ला करुन रशियन युद्धनौका बुडवण्यात आली.

हे ही वाचा:

अमेरिकेकडून भारताला मिळणार ३१ एमक्यू- ९ बी सशस्त्र ड्रोन्स

मालदिवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात; अन्य देशांच्या मदतीतही घट

पंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर

पेपरफुटी रोखणारे विधेयक सोमवारी संसदेत सादर होणार

रशिया आणि युक्रेनमध्ये २०२२ पासून युद्ध सुरु आहे. मागच्या दीड ते पावणेदोन वर्षात या युद्धात दोन्ही बाजूंच्या हजारो सैनिकांनी आणि सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. रशियाने युक्रेनच्या काही भागांवर ताबा मिळवला आहे. युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये यासाठी या युद्धाला तोंड फुटले होते. दरम्यान, युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशांकडून युद्ध साहित्य आणि आर्थिक मदत मिळत आहे.

Exit mobile version