पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे

पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे

रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आता संपूर्ण जग चिंतेत आहे. या संघर्षामध्ये युक्रेन एकटा पडल्याचे चित्र होते. मात्र, नुकतेच त्यांनी केलेल्या ट्विटनुसार युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

आतापर्यंत युक्रेनला या संघर्षात मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था अधिक बिकट होत चालली होती. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपण बोललो, असे झेलेन्स्की म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदी यांना एकूणच परिस्थितीचा आढावा दिला. आमच्या भूमीवर १ लाख आक्रमणकर्ते आहेत. ते अतिशय क्रूरपणे रहिवाशी इमारतींवर हल्ले करतायत, असे झेलेन्स्की म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताने आम्हाला राजकीय मदत करावी. एकत्रीतपणे आक्रमणकर्त्यांना थांबवूया, असे झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’

आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर

कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या आक्रमणाविरोधात ठराव मांडण्यात आला. या ठरावावर सार्वमत घेण्यात आले. त्यात भारत, चीन, संयुक्त अरब अमिरातीने या ठरावावर बहिष्कार टाकला आहे. याआधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने दोनही देशांना शांतता ठेवण्याचे आणि युद्ध टाळण्याचे आवाहन केले होते. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी देखील नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली होती. त्यांनाही युद्ध न करता चर्चा करून प्रश्न सोडवण्यात यावा असा सल्ला दिला होता. मात्र, आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी फोन केल्यामुळे आता भारताचा निर्णय काय असणार किंवा भूमिका काय असणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version