27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरदेश दुनियासंयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनकडून रशियाचा ‘दहशतवादी देश’ म्हणून उल्लेख

संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनकडून रशियाचा ‘दहशतवादी देश’ म्हणून उल्लेख

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपायचं नाव घेत नसताना आता पुन्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरूवात केली आहे.

Google News Follow

Related

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपायचं नाव घेत नसताना आता पुन्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक युक्रेनच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. दरम्यान, संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनने रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनकडून रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला गेला. रशियाने सतत केलेल्या हल्ल्यामुळे हा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे. या युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत असून रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांची आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे.

रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर मिसाईल्स हल्ले केले आहेत. राजधानी किव्हवर ७५ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते. त्यापैकी ४१ क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई दलाने पाडले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”

आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, “संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत. तसेच रशिया आम्हाला नष्ट करण्याचा आणि पृथ्वीतलावरून आम्हाला पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा