रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील संघर्ष काही थांबायचे नाव घेत नाहीये. दिवसागणिक हा संघर्ष अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यातच रशियाने आता युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र असल्याची मान्यता दिल्यामुळे हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युक्रेनमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी सही केली आहे. रशियाच्या या चालीमुळे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देशांमधील युद्ध अटळ आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
२०१४ साली युक्रेन मधील काही फुटीरतावाद्यांना पूर्व युक्रेन मधले डोनेट्स्क आणि लुहान्स्क हे दोन प्रदेश स्वतंत्र म्हणून घोषित केले. या फुटीरतावाद्यांनी या संपूर्ण प्रदेशात आपला जम बसवला आहे. या सर्व फुटीरतावाद्यांना रशियाचा पाठिंबा असल्याचे सुरुवातीपासूनच म्हटले जात होते. पण असे असले तरीही २०१४ पासून आज पर्यंत या प्रदेशांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली नव्हती. पण आता रशियाने या प्रदेशांच्या स्वतंत्र असण्याला मान्यता दिली आहे. रशियाने आजवर त्या फुटीरतावाद्यांना शस्त्रास्त्र पुरवणे, आर्थिक रसद पुरवणे, पासपोर्ट पुरवणे अशा सर्व प्रकारची मदत केल्याचे म्हटले जाते.
हे ही वाचा:
‘लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाचा निर्णय मागे घ्या!’
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या
काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाईल्स’ चे ट्रेलर प्रदर्शित
झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या
पण आता या प्रदेशांना स्वतंत्र म्हणून रशियाने मान्यता दिल्यामुळे आता युक्रेन रशिया संघर्ष वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आता उघडपणे या फुटीरतावाद्यांना सैनिकी मदत पुरवून या दोन्ही प्रदेशांवर कब्जा मिळवण्यासाठी आणि युक्रेनियन सैन्याचा सामना करण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष रशियाकडे लागले आहे.