दूतावासाचा भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला

युक्रेनमध्ये नुकतेच झालेले हल्ले पाहता नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दूतावासाचा भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला

युक्रेनमध्ये नुकतेच झालेले हल्ले पाहता नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने आपल्या ऍडव्हायझरीमध्ये हा सल्ला दिला आहे. याशिवाय युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह भारतीयांनी लवकरात लवकर येथून निघून जावे असाही सल्ला दूतावासाने दिला आहे.

खरं तर, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा भारताने मोठ्या प्रमाणावर भारतीयांना परत आणले होते. मात्र, आता सरकार अशी कोणतीही सुविधा देणार नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी लोकांना स्वतःचा मार्ग शोधावा लागेलं असं दूतावासाने म्हटलं आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन-व्याप्त युक्रेनच्या चार क्षेत्रांमध्ये मार्शल लॉ घोषित केला आणि सर्व रशियन प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आणीबाणीचे अधिकार दिले. पुतिन यांनी तात्काळ मार्शल लॉ अंतर्गत कोणती पावले उचलली जातील हे स्पष्ट केले नाही, परंतु त्यांचा आदेश गुरुवारी लागू होईल असे सांगितले. आपल्या आदेशात त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांना विशिष्ट प्रस्ताव सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

झेलेन्स्की यांच्या कार्यालयालाही लक्ष्य केले

क्रिमिया पुलावरील हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. अशाप्रकारे अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियाने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयालाही लक्ष्य केले. रशिया आणखी आक्रमक भूमिका घेत आहे. त्याचवेळी युक्रेनही गुडघे टेकायला तयार नाही, पाश्चात्य देश त्याला संरक्षण साहित्य पुरवत आहेत. अशा स्थितीत युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version