रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये महिन्याभरापेक्षा अधिक काळ झाला तरीही युद्ध संपलेले नाही. युद्धात रशियाकडून युक्रेनची अनेक शहरे बेचिराख करण्यात आली. तर या युद्धात रशियाचे देखील मोठं नुकसान झाले आहे. मात्र, आता युक्रेनने रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. रशियाच्या एका ऑईल डेपोवर युक्रेनने हल्ला केला आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला करून युक्रेनचे मोठे नुकसान झाले होते. अखेर आता यूक्रेनच्या सैन्याने रशियन सैन्याला प्रत्युत्तर दिलं आहे. युक्रेन सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी रशियाच्या बेलगोरोडमध्ये आक्रमण केलंय. या हेलिकॉप्टर्सनी रशियन ऑईल डेपोवर हल्ला केला. त्यानंतर डेपोमध्ये आग लागली आणि स्फोट झाले. बेलगोरोडचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लेडकोव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ऑईल डेपो जवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून रशियन ऑईल डेपोवर हेलिकॉप्टर्सने कमी उंचीवरुन हल्ला केला. त्यानंतर ऑईल डेपोमध्ये आग लागली.
Ukraine attacked oil depot inside Russia – governor
More: https://t.co/QNeWXTk3Yt pic.twitter.com/LzP6qBN38h
— RT (@RT_com) April 1, 2022
हे ही वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृह खात्याच्या कामाने समाधानी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवावे
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
या हल्ल्याबाबत युक्रेनकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. पण रशियाने हा हल्ला युक्रेनकडून करण्यात आल्याचा दावा केला आहे. युध्द सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेनने थेट रशियात घुसून हल्ला केल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.