सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या शांतता चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने युद्धबंदीला सहमती दर्शविल्याचे स्वागत केले आहे. शिवाय रशियाही त्याला सहमती देईल अशी आशा व्यक्त केली आहे. या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्हीचे सैनिक मारले जात आहेत असे सांगून ट्रम्प म्हणाले की युद्धबंदी करणे खूप महत्त्वाचे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियासोबत युद्धबंदी करण्यास युक्रेनने सहमती दर्शवल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले. मंगळवारी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे अमेरिकन प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर कीव्हने मॉस्कोसोबत ३० दिवसांचा युद्धबंदी करार स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान आले. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धात दोन्ही बाजूंनी मारल्या जाणाऱ्या सैनिक आणि नागरिकांच्या संख्येबद्दल दुःख व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की हे थांबणे आवश्यक आहे आणि युद्धबंदी खूप महत्त्वाची आहे.
ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, युद्धबंदीवर थोड्या वेळापूर्वीच त्यावर सहमती झाली. आता आपल्याला रशियाला जावे लागेल आणि आशा आहे की, अध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील त्यावर सहमती देतील. शहरांमध्ये स्फोट होत असताना शहरांमध्ये लोक मारले जात आहेत. आम्हाला ते युद्ध संपवायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले.
युक्रेनने ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून तीन वर्षांच्या युद्धानंतर रशियाशी वाटाघाटी करण्यास सहमती दाखवली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या जाहीर वादानंतर, मंगळवार, ११ मार्च रोजी जेद्दाह येथे झालेली चर्चा ही दोन्ही देशांमधील पहिली अधिकृत बैठक होती. येथे युक्रेनियन प्रतिनिधींनी अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला ज्यामध्ये तात्काळ ३० दिवसांचा युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली होती. चर्चेत सहभागी असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की ते रशियासमोर हा प्रस्ताव मांडतील आणि चेंडू आता त्यांच्या कोर्टात आहे.
हे ही वाचा :
जाफर एक्सप्रेस अपहरण: १६ अपहरणकर्त्यांचा खात्मा; १०४ प्रवाशांची सुटका
त्या योद्ध्याला नमन, जो शरण गेला नाही तर मृत्यू स्वीकारला!, विकी कौशलची मानवंदना
पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले महाकुंभाचे गंगाजल, मखाना आणि बनारसी साडी
काँग्रेसचे नवे टूलकिट? वक्फ विधेयक विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे रस्ते अडवा!
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आता रशियाला सकारात्मक प्रस्तावावर सहमती देण्यासाठी राजी करणे अमेरिकेचे काम आहे. झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे आभार मानण्यासाठी टेलिव्हिजनवर हजेरी लावली आणि सांगितले की युक्रेन शांतता शोधण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरून युद्ध परत येऊ नये.