भारतातील हवाई क्षेत्राचे नवे ‘चौथे उडान’

भारतातील हवाई क्षेत्राचे नवे ‘चौथे उडान’

देशातील हवाई वाहतूकीला बळ देण्यासाठी म्हणून सरकारने उडान ४.१ करता निविदा प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

निविदा प्रक्रियेची कागदपत्रे नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रक्रियेत रस असलेल्या विमान कंपन्यांसाठी ती खुली आहेत. गुंतागुंतीची निविदा प्रक्रिया सहा आठवडे चालणार आहे.

नागरी विमानचालन मंत्रालयाच्या माहितीनुसार उडान ४.१ अंतर्गत देशाभरातील छोट्या शहरांना जोडण्यासाठी विमान कंपन्यांच्या संचलनात काही प्रमाणातील सूट देण्यात आली आहे. त्याबरोबरच सागरमाला सीप्लेन सर्विसेसच्या अंतर्गत काही नवीन मार्ग देखील चालू करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

भारत-पाकिस्तानात पाण्यावरून चर्चा

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट?

‘या’ सहा बँकांचे खासगीकरण तूर्तास नाही

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

त्याच्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे वेळापत्र नसलेल्या सीप्लेन आणि विविध तऱ्हेच्या विमानांच्या संचलनासाठी परवानगी देण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’च्या पार्श्वभूमीवर ही योजना चालू करण्यात आली आहे. अनेक छोट्या शहरांना, गावखेड्यांना हवाई मार्गाने जोडून त्यांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट राहिले आहे. त्याबरोबरच त्या भागात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रव्यापी वाजवी दरातील हवाई प्रवासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांना देखील यामुळे हवाई मार्गांशी जोडले जाणार आहे.

उडान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ३२५ मार्गांवर ५६ विमानतळ, ५ हेलिपॅड आणि २ पाण्यावरील एअरोड्रोन यांचा वापर सुरू झाला आहे.

Exit mobile version