संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस एक मोठी घोषणा केली होती. राष्ट्रपतींनी रमजानपूर्वी मोठ्या प्रमाणात कैद्यांना माफी देण्याबद्दल बोलले होते. याच पार्श्वभूमीवर आता रमजानच्या शेवटी १,२९५ कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृत्तानुसार, पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी १,५१८ कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ५०० हून अधिक भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.
युएईच्या राष्ट्रपतींकडून माफी मिळाल्यानंतर, सुटका झालेले लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करू शकतील. यूएई सरकारच्या या निर्णयामुळे ज्या भारतीय कुटुंबांचे नातेवाईक तिथल्या तुरुंगात शिक्षा भोगत होते त्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय दूतावासाने या निर्णयाचे स्वागत केले आणि युएई सरकारचे आभार मानले आहे.
हे ही वाचा :
गाझामध्ये इस्रायली हल्ला, हमास प्रवक्त्यासह सात जण ठार!
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या चकमकीत ३ पोलीस हुतात्मा!
पूरन-मार्शच्या स्फोटक खेळीने लखनौला ‘हैदराबादी तडखा’
उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ?
खरे तर, यूएई सरकार अनेकदा रमजानपूर्वी मानवतावादी कारणास्तव कैद्यांना माफी देते. यावर्षीही राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी हे पाऊल उचलले आहे आणि १,२९५ कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण लोकसंख्येपैकी ३७.९६ टक्के भारतीय आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये भारतीयांची लोकसंख्या ३५ लाखहून अधिक आहे. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.