संयुक्त अरब अमिराती (युएई) सरकारने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्या नियमानुसार आठवड्यातील पाच दिवस काम करण्याची मर्यादा आणखी कमी केली आहे. देशातील कामकाजाचा आठवडा हा आता पाच ऐवजी साडे चार दिवसांचा असणार आहे, असे मंगळवारी युएई सरकारकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन
सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…शेवटचा दिवस
ममता म्हणतात, सकारात्मक बातम्या छापा आणि जाहिराती घ्या!
युएईमध्ये काम करणे आता लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार असून सरकारने कामाचे दिवस कमी केले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार सोमवार ते गुरुवार सकाळी ७.३० ते दुपारी 3.३० पर्यंत कामाचे तास असतील. तर, शुक्रवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत काम केले जाईल आणि हा दिवस कामकाजाचा अर्धा दिवस असेल. सरकारचा हा नवा आदेश पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारीपासून लागू होणार आहे. या घोषणेमुळे, युएई हा जगातला पहिला देश बनेल ज्यामध्ये एका आठवड्यात पाच दिवसांपेक्षा कमी कामकाजाचे दिवस असतील.
#UAE announces today that it will transition to a four and a half day working week, with Friday afternoon, Saturday and Sunday forming the new weekend.
All Federal government departments will move to the new weekend from January 1, 2022. pic.twitter.com/tQoa22pai9
— UAEGOV (@UAEmediaoffice) December 7, 2021
देशातील व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी सरकारने आपले कामकाजाचे वेळापत्रक अमेरिका, लंडन आणि इतर युरोपीय देशांप्रमाणे ठेवले आहे. त्याचबरोबर लोकांचा काम आणि वैयक्तिक आयुष्यातील ताळमेळ सुधारण्यासाठी यूएई सरकारने ही घोषणा केली आहे.