जपानमध्ये चक्रीवादळाचा कहर, लाखो लोक बेघर

अलिकडच्या दशकात देशातील सर्वात मोठे वादळ

जपानमध्ये चक्रीवादळाचा कहर, लाखो लोक बेघर

जपानमधील नानमाडोल चक्रीवादळामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. नानमडोल वादळामुळे जाेरदार वारे वाहत असून अनेक ठिकाणी चिखल निर्माण झाल्याने येथील परिस्थिती बिकट झाली आहे. अलिकडच्या दशकात देशातील सर्वात मोठे वादळ असल्याचं म्हटल्या जात आहे. हे वादळ बुधवारपर्यंत समुद्राकडे जाण्यापूर्वी पूर्वेकडे वळेल आणि जपानच्या मुख्य बेट होन्शुवर जाण्याची शक्यता आहे, बीबीसीने वृत्त दिले आहे.
वादळामुळा फुकुओका प्रांतामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मियाझाकी प्रांतात शेतात बुडलेल्या कारमधून बाहेर काढल्यानंतर आणखी एका व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. हे वादळ यामागुची प्रांतातून हागी जवळ वेगाने पुढे जात आहे, जोरदार वारे आणि माेठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. बुलेट ट्रेन आणि शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत या वादळानंतर निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे ७० लाेक जखमी झाले आहेत.

जपान हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ २०सप्टेंबरपर्यंत जपानच्या सर्वात मोठ्या बेटावर, होन्शु येथे पोहोचण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हवामान बदलाच्या परिणामी अटलांटिक आणि कॅरिबियनमधील समुद्राच्या पृष्ठभागाच्या उबदार तापमानामुळे चक्रीवादळाची वारंवारता आणि तीव्रता प्रभावित होण्याची अपेक्षा आहे.वादळ ताशी २३४ किमी गाने पोहोचल्यानेरे उद्ध्वस्त झाली आणि वाहतूक आणि व्यवसाय विस्कळीत झाले आहेत. हे वादळ चार किंवा पाच श्रेणीतील वादळाच्या बरोबरीचे असल्याचे बीबीसीने वृत्त दिले आहे .

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

साडेतीन लाख घरांत बत्ती गूल

हजारो लोकांना आपत्कालीन आश्रयस्थानांमध्ये आसरा घ्यावा लागला असून जवळपास साडेतीन लाख घरांमधील बत्ती गूल झाल्यामुळे अनेक नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. जपानच्या हवामान खात्याने कोगोशिमा प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी इशारा जारी केला आहे. ओकिनावा क्षेत्राबाहेरचे हे पहिलेच चक्रीवादळ असल्याने विशेष इशारा हवमान खात्यानं दिला असल्याचं सांगितल्या जात आहे. ९९ दशलक्ष लोकांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे बुधवारपर्यंत पुढील २४ तासांत ४०० मिमी (१६ इंच) पावसाचा अंदाज आहे.

Exit mobile version