स्वीडिश नागरिकांची हत्या करणारा दहशतवादी ‘इस्लामिक स्टेट’चा

या बंदुकधाऱ्याच्या भीतीने प्रशासनाने स्वीडन विरुद्ध बेल्जियम हा सामनाही थांबवला

स्वीडिश नागरिकांची हत्या करणारा दहशतवादी ‘इस्लामिक स्टेट’चा

बेल्जियममधील ब्रसेल्स शहरात एका बंदुकधाऱ्याने दोघा स्वीडिश नागरिकांची हत्या करून तिसऱ्याला जखमी केले होते. हा दहशतवादी इस्लामिक स्टेट अर्थात आयएस या संघटनेचा असल्याचे उघड झाले आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात तो ‘मी इस्लामिक स्टेटचा सदस्य आहे,’ असे सांगत असल्याचे दिसत आहे. या बंदुकधाऱ्याच्या भीतीने प्रशासनाने स्वीडन विरुद्ध बेल्जियम हा सामनाही थांबवला. फुटबॉल युरोपियन चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्यासाठी हा सामना होणार होता.

 

या बंदुकधाऱ्याने हा व्हिडीओ स्वतःच चित्रित केला आहे. ‘अल्ला हू अकबर. माझे नाव अब्देसालेम अल गिलानी असून मी अल्लाहचा सैनिक आहे. मी इस्लामिक स्टेट या संघटनेचा सदस्य आहे. जे आमच्यावर प्रेम करतात, त्यांना आम्ही प्रेम देतो. तर, जे आमचा तिरस्कार करतात, त्यांचा आम्ही तिरस्कार करतो. आम्ही आमच्या धर्मासाठी जगतो आणि धर्मासाठीच मृत्यूला सामोरे जातो. अलहमदुल्लाह. तुमच्या भावाने मुस्लिमांचा सूड घेतला. त्यामुळेही मीही अलहमदुल्लाहसाठी तीन स्वीडिश नागरिकांना ठार केले. मी त्यांच्या प्रति चुकीचे वागलो. कदाचित ते मला माफ करतील आणि मीही प्रत्येकाला माफ करेन. सलाम आलेक्कूम,’ असे त्याने या व्हिडीओत नमूद केले आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंना दणका; शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

उघड्याकडे नागडा गेला…

निठारी हत्याकांडातील दोषी कोली, पंधेर निर्दोष, मृत्युदंडाची शिक्षा रद्द

आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या ऐश्वर्याला घर, नोकरीचे आश्वासन!

या संशयित दहशतवादी घटनेमागील हेतूचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. हमासने इस्रायलवर हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन शहरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र अद्याप तरी या युद्धाशी संबंध दर्शवणारे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

 

बंदुकधाऱ्याच्या हल्ल्यात तिसरी जखमी झालेली व्यक्ती ही टॅक्सीचालक आहे. धोका कमी होईपर्यंत प्रशासनाने ब्रसेल्सच्या रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, युरोपियन उच्चायुक्त अधिकाऱ्यांनाही घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेल्जियम-स्विडन यांच्यामधील फुटबॉलचा सामना रद्द करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना बघण्यासाठी आलेल्या सुमारे ३५ हजार नागरिकांना स्टेडिअममध्येच ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. ‘आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. तसेच, ब्रसेल्सच्या नागरिकांना सतर्त राहण्याच्या सूचना दिल्या आहेत,’ असे बेल्जियमचे पंतप्रधान डे क्रू यांनी सांगितले.

Exit mobile version