परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू

रॉयल मलेशियन नेव्ही नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी सुरू होता सराव

परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू

मलेशियामध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन नौदलाच्या हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान १० जणांनी आपला जीव गमावला आहे. लुमुट नौदल तळावर मंगळवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल मलेशियन नेव्ही नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ते सराव करत होते. यावेळी आकाशातच दोन्ही हेलिकॉप्टरची टक्कर झाली. सकाळी ९.३२ च्या दरम्यान ही भीषण घटना घडली. HOM (M503-3) आणि Fennec (M502-6) या मॉडेल्सची ही दोन हेलिकॉप्टर होती. लुमुट नौदल तळावर ही टक्कर झाली. नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही हेलिकॉप्टरमधील सर्व १० क्रू सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांना ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश

‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’

हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर एमडीएच, एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी होणार

मलेशियन नौदलाच्या या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला याचा तपास आता करण्यात येत असून यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच नौदलाने मृत सदस्यांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version