अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याची चिन्ह दिसत नसून शिकागोमध्ये गोळीबार झाला आहे. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नाईट क्लबमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. रविवार, १२ जून रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शिकागोजवळील गॅरी परिसरात असलेल्या इंडियाना नाईट क्लबमध्ये काल गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३४ वर्षीय व्यक्तीवर नाईटक्लबच्या गेटवर आणि २६ वर्षीय तरुणीवर क्लबच्या आतमध्ये गोळीबार करण्यात आला. दोघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. चार जण जखमी झाले असून यामधील एकाची स्थिती गंभीर आहे. प्रशासनाने अद्याप पीडितांची माहिती दिलेली नाही. तसेच गोळीबाराचं नेमकं कारण काय याबद्दलही सांगण्यात आलेलं नाही. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात
लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे ५ जून रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले होते. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत असून २ जून रोजी ओक्लाहोमा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात गोळीबार झाला होता, यामध्ये शुटरसह चार जणांना प्राण गमवावे लागले होते. याशिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सारं जग हादरलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही अमेरिकेतील या घटनांबद्दल काळजी व्यक्त केली होती.