कॅनडामधील विमान अपघातात दोन भारतीय ट्रेनी पायलट्सचा मृत्यू

उंच झाडांना धडकून अपघात झाल्याची शक्यता

कॅनडामधील विमान अपघातात दोन भारतीय ट्रेनी पायलट्सचा मृत्यू

कॅनडामध्ये विमान दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय ट्रेनी पायलट्सचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पायलट अभय गडरु आणि यश विजय रामुगडे या दोघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. या दुर्दैवी घटनेमध्ये एकून तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील चिलीवॅकमध्ये एका लहान विमानाचा अपघात झाला. या अपघातात दोन भारतीय पायलट्ससह एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन इंजिन असलेले कमी वजनाचे विमान पायपर पीए- ३४ सेनेका हे ब्रिटिश कोलंबियाच्या चिलीवॅक शहरामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.

हे ही वाचा:

आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘शतक’

माहितीनुसार, उंच झाडांना धडक बसल्याने विमानाचा अपघात झाला. या घटनेचा अधिकचा तपास अजून सुरू असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तपास करणारे अधिकारी घटनास्थळी दाखल होणार आहेत. तर, हेली मॉरिस या व्यक्तीने सांगितली की, हे विमान जंगलाच्या भागात झाडांना कोसळून पडल्याचे पाहिले.

Exit mobile version