तेलंगणातील दोन विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील ऍरिझोनामध्ये गाडीअपघातात मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. गौतम कुमार पारसी (१९) आणि मुक्का निवेश (२०) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी एका वेगाने आलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला.
पीओरिया येथे झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांची गाडी चालवणारा चालक व ज्या गाडीची धडक त्यांच्या गाडीला बसली, तो फोर्डचा गाडी चालक असे दोघे जखमी झाले. त्या दोघांना उपचाराअंती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी पोलिसांनी त्यांची ओळख अद्याप सांगितलेली नाही.
हे ही वाचा:
अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश
‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर एमडीएच, एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी होणार
तैवानला पुन्हा भूकंपाचे धक्के; १७ जण जखमी
गौतम आणि निवेश हे दोघे ऍरिझोना स्टेट विद्यापीठात कम्प्युटरमध्ये बीएसचे शिक्षण घेत होते. गौतम याने सन २०२२मध्ये या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. गौतम पुढच्या महिन्यात भारतात येणार होता. त्यासाठी त्याने तिकिटेही बुक केली होती, अशी माहिती हाती आली आहे. त्याचे कुटुंब जानगाव जिल्ह्यातील असून त्याचे वडील पी. कमल कुमार गुप्ता हे सोन्याचे व्यापारी आहेत. तर, निवेश हा करिमनगर येथील हुझुराबाद येथील असून त्याची आई नेहा आणि वडील नवीन हे दोघेही डॉक्टर आहेत.