इस्रायल विरोधात इराण आता संघर्षाच्या मैदानात उतरल्यामुळे मध्य आशियामध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. हमास आणि हिजबुल्ला यांना इस्रायलने लक्ष्य केले असून इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर सुमारे १८० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर आता इस्रायलने इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. इराणने मोठी चूक केली असून आता त्याची किंमत चुकवावी लागेल, असे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू म्हणाले. या संघर्षाची झळ आता हळूहळू युरोपमध्ये बसू लागल्याने जगभरात चिंता वाढली आहे.
बुधवार, २ ऑक्टोबर रोजी युरोपातील देश डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती अस्मोर आली आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच्या उत्तरेकडील इस्त्रायली दूतावासाजवळ हे दोन स्फोट झाले. डॅनिश पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून ते या प्रकरणाचा करत आहेत.
Danish police investigate two blasts near Israel's embassy in Copenhagen https://t.co/yajK2wGdMr pic.twitter.com/zsm1H3VxIp
— Reuters (@Reuters) October 2, 2024
घटनेची माहिती देताना कोपनहेगन पोलिसांनी सांगितले की, “या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाले नाही, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.” मात्र, इस्रायलच्या दूतावासाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डेन्मार्कमधील हे बॉम्बस्फोट अशा वेळी झाले आहेत जेव्हा इस्रायल इराणशी संघर्षात अडकला आहे. मात्र, डेन्मार्कच्या घटनेचा इराणसोबतच्या संघर्षाशी कोणताही संबंध अद्याप समोर आलेला नाही. डॅनिश पोलिसांनी या स्फोटांबाबत काहीही बोलणे घाईचे असल्याचे म्हटले आहे. स्फोटाच्या तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
हे ही वाचा:
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा
हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू
परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक
हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा खात्मा इस्रायलने केला. यानंतर इराण पेटून उठला असून त्यांनी इस्रायलला याचा बदला घेणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर इराणने मंगळवारी उशिरा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आता परिणामांसाठी तयार राहावे, असे कडक उत्तर इस्रायलने दिले आहे.