31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरदेश दुनियालागोपाठ दोन शरीरसौष्ठवपटू करोनाने गेले!

लागोपाठ दोन शरीरसौष्ठवपटू करोनाने गेले!

Google News Follow

Related

जगदीश लाड, मनोज लाखनच्या निधनाने हळहळ

करोनाने अवघ्या जगात थैमान घातलेले असताना त्यात अनेकांचे मृत्यू चटका लावून जात आहेत. अशा वातावरणात महाराष्ट्राने दोन हरहुन्नरी शरीरसौष्ठवपटू गमावले. महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जगदीश लाड अवघ्या ३४व्या वर्षी गेला तर रेल्वेत नोकरीला असलेल्या ३० वर्षीय मनोज लाखनला अकाली काळाने ओढून नेले. दोघेही करोनाचे बळी ठरले. शरीरसौष्ठवासारख्या फिटनेस किंवा तंदुरुस्तीशी संबंधित क्षेत्रातील दोन खेळाडू तडकाफडकी गेल्याने या क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रातील प्रचंड मेहनत करून वर आलेले खेळाडू जर करोनामुळे मृत्युमुखी पडत असतील तर सर्वसामान्यांचे काय, अशी एक भीतीही या दोघांच्या निधनामुळे निर्माण झाली आहे.
आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीने तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोरही जबरदस्त आव्हान उभं करणारा महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड करोनाविरूद्धचे आव्हान मात्र परतवू शकला नाही. हजारो तरूणांना फिटनेसचे धडे देणाऱ्या जगदीशचे अवघ्या ३४ वर्षी निधन झाल्यामुळे भारतीय शरीरसौष्ठव जगताला जबर धक्का बसला आहे. लाखनला मिरारोड येथील रुग्णालयात दाखल केले तेव्हा ऑक्सिजनची पातळी खाली घसरली होती. त्यातून तो उभारी घेऊ शकला नाही.

प्रतिष्ठेच्या किताबांचा मानकरी

जगदीश लाड नेहमीच भारतातील “टॉप टेन” शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणला जायचा. त्याने नवी मुंबई महापौर श्री, नवी मुंबई श्री या प्रतिष्ठेच्या किताबासह भारत श्री आणि महाराष्ट्र श्री या स्पर्धेत ९० किलो वजनी गटात तीन-तीन वेळा सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत दोन रौप्य पदके त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवात मोठी दुर्घटना

नवी मुंबईत एक अत्याधुनिक जिम सुरू करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. तेव्हाच त्याला अहमदाबाद येथून “लाईफ फिटनेस ” या जिमचे व्यवस्थापन सांभाळायची ऑफर आली. त्याने ही ऑफर स्वीकारली आणि तो दोन वर्षांपूर्वीच आपल्या बायको-मुलीसह अहमदाबादला स्थायिक झाला. तिथे त्याचे करोनामुळे निधन झाले.
२०१५ साली बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेतही त्याला ९० किलो वजनी गटात पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रीय स्पर्धेत त्याची गाठ नेहमीच संग्राम चौगुले, विपीन पीटर, सुनीत जाधवसारख्या तगड्या खेळाडूंशी पडायची आणि जबरदस्त तयारीत असूनही त्याचे सोनं थोडक्यात हुकायचं. पण त्याने जिद्द कधीच सोडली नव्हती. मि. युनिव्हर्स प्रेमचंद डेगरांना आदर्श मानून वयाच्या अठराव्या वर्षी त्याने जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली. या खर्चिक खेळात प्रारंभी त्याचा निभाव लागत नव्हता. म्हणून त्याने फिजीकल ट्रेनर म्हणून अनेक प्रतिष्ठीत लोकांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याने आपल्या शरीरसौष्ठव घडविले. त्याच्या निधनामुळे आम्ही एक विजेताच नव्हे एक प्रामाणिक खेळाडू गमावल्याची भावना महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, सरचिटणीस पाम रोठे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत यांनी वाहिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा