अफगाणिस्तान स्फोटाने हादरला; नऊ जण ठार

अफगाणिस्तान स्फोटाने हादरला; नऊ जण ठार

गुरुवार, २८ एप्रिल रोजी अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरला आहे. अफगाणिस्तानच्या बल्फ प्रांतात काल संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात नऊ जण ठार झाले असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात हा स्फोट झाला. तर दोन्ही स्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला टार्गेट करण्यात आल्याचे ‘टोलो न्यूज’ने सांगितले. स्फोटानंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि दहशत निर्माण झाली होती. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटांची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही.

गेल्या गुरुवारी मजार-ए-शरीफ येथे स्फोट झाला होता. त्यावेळी या स्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्लामिक स्टेटने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. रमजानच्या पवित्र महिन्यात उत्तर मजार-ए-शरीफ येथील साई डोकान मशिदीत नमाज पढत असताना हा स्फोट झाला होता.

हे ही वाचा:

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

अफगाणिस्तानमधील शिया समुदायाला अनेकदा निशाण्यावर घेतले जाते. त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अनेकदा त्या हल्ल्यांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.

Exit mobile version