30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामापरदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

Google News Follow

Related

भारत सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात डीआरआयने परकीय चलनाची मोठी तस्करी रोखली आहे. शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर ही संभाव्य तस्करी रोखण्यात डीआरआयच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे आहे. या कारवाईत तब्बल ३.७ कोटी रुपये मूल्य असलेले परकीय चलन ताब्यात घेण्यात आले असून ते बाळगणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) भारतातून परदेशात परकीय चलनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. ऑपरेशन चेक शर्ट्स या मोहिमेच्या अंतर्गत सर्व माहितीचे विश्लेषण करून हे चलन बाळगणाऱ्या दोन प्रवाशांची माहिती डीआरआयला मिळाली. या माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून या दोन्ही प्रवाशांना मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

हे दोघेजण शारदाला पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याजवळील बागेमध्ये हे परकीय चलन सापडले. हे चलन अमेरिकन डॉलर आणि सौदी दिऱ्हाम या स्वरूपात होते. बागेच्या तळाशी विशिष्ट प्रकारे तयार करण्यात आलेल्या छुप्या पोकळ्यांमध्ये ते परकीय चलन मोठ्या चलाखीने लपवण्यात आले होते. सामान्य पद्धतीने सामानाचे स्कॅनिंग केले तर त्यात हे चलन सापडणार नाही अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. पण सतर्क डीआरआय अधिकाऱ्यांनी ते बरोबर शोधून काढले.

या दोन्ही प्रवाशांकडे सापडलेले परकीय चलन वैध असल्याचे दाखवणारी किंवा चलनाची ही निर्यात कायदेशीर दर्शवणारी कोणतीही कागदपत्रे नव्हती. या दोनही जणांविरोधात सीमाशुल्क कायदा, १९६२ तसेच इतर कायद्यांच्या योग्य त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा