ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा उघड

ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा उघड

जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने पुन्हा एकदा आपला हिंदू विरोधी चेहरा दाखवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. हिंदूंसाठी न्याय मागणाऱ्या बांगलादेशमधील दोन ट्विटर अकाउंट्स ट्विटर या साईट कडून बंद करण्यात आली आहेत. यावरूनच ट्विटर विरोधात टीकेची झोड उठली असून त्यांच्या या कारवाईबद्दल सवाल केला जात आहे.

गेल्या काही काळापासून बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायाची जगभर चर्चा होताना दिसत आहे. तिथे हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे, हिंदूंची कत्तल केली जात आहे, हिंदूंची घरे जाळली जात आहेत. या सर्वांच्या विरोधात सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत आहेत. अशातच बांगलादेशी हिंदूंसाठी न्यार मागणारी आणि तिथल्या हिंदूंची अवस्था जगासमोर मांडणाऱ्या दोन ट्विटर अकाउंट्स वर कारवाई करून ती बंद पाडण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

‘कॅप्टन’ काढणार स्वतःचा नवा ‘संघ’

गळा चिरला, पाय छाटले…महिला हत्याकांडाने राजस्थान हादरले

त्यातील एक अकाऊंट हे इस्कॉनचे असून दुसरे अकाउंट बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिल यांचे आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील बांगलादेश हिंदू युनिटी काउंसिलचे ट्विटर खाते हे ब्लू टीक असलेले व्हेरिफाईड खाते होते. या कारवाईमुळे ट्विटरवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. इस्कॉनच्या अधिकृत खात्यावरून या कारवाई विषयी सवाल उपस्थित केला असून ट्विटरने याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्विटर या आधीही अनेकदा अशा प्रकारचा एक तर्फी कारवाईसाठी टीकेच्या घेऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले आहे. या कारवाईतून ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version