नायजेरियाची ट्विटर बंदी, ‘कू’ साठी संधी

नायजेरियाची ट्विटर बंदी, ‘कू’ साठी संधी

अनिश्चित काळासाठी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर बंदी घालण्याचा निर्णय नायजेरियन सरकारने घेतल्यानंतर त्याचा फायदा कू या मायक्रोब्लॉगिंग साईटला होऊ शकतो. या परिस्थितीचा लाभ करून घेत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कू ने आता नायजेरियावर लक्ष केंद्रित केले आहे. नायजेरियातील नागरिकांना कू उपलब्ध असून लवकरच त्यांना स्थानिक भाषांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कू या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ असलेले अप्रमेय राधाकृष्णन यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

ट्विटर या जागतिक दर्जाच्या मायक्रोब्लॉगिंग साईटवर बंदी घालण्याचा निर्णय नायजेरियन सरकारने घेतला आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी असल्याचे नायजेरियन सरकारकडून सांगण्यात आले आहे. ट्विटर आणि नायजेरियन सरकार यांच्यातल्या या वादात ‘भारतीय ट्विटर’ अशी ओळख असलेल्या कू या मायक्रोब्लॉगिंग साईटने संधी शोधली आहे. ‘कू’ हे नायजेरियात उपलब्ध असून तिथल्या स्थानिक भाषेचे पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘कू’ ही कंपनी सध्या काम करत आहे. त्यामुळे नायजेरियातील ट्विटरबंदी ही कू साठी फायद्याची ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

नायजेरियन सरकारचा ट्विटरला दणका

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे

नायजेरियाने का घातली ट्विटरवर बंदी?
नायजेरियन सरकारने ट्विटरला दणका देत ट्विटर या साईटवर देशात बंदी आणली आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून युद्धा संबंधीचे एक ट्विट केले होते. हे ट्विट साईटच्या नियमाला अनुसरून नसल्याचे सांगत ट्विटरने त्या ट्विटवर कारवाई केली राष्ट्रपतींचे डिलीट करण्यात आले पण यावरूनच नायजेरियन सरकार ट्विटरवर चांगलेच संतापले आहेत देशाच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्यासाठी ट्विटर या प्रकाराचे वर्तन करत आहे असा आरोप नायजेरिया सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरवर कारवाई करताना नायजेरियन सरकारने अनिश्चित काळासाठी ट्विटरवर बंदी घातली आहे.

Exit mobile version