लिंडा याकारिनो या नवीन ट्विटर सीईओ होणर आहेत. आगामी सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. त्यांची नियुक्ती झाल्याचे ट्विटरचे सीईचो एलन मस्क यांनी जाहीर केले. याकारिनो या प्रामुख्याने व्यावसायिक कामकाजावर लक्ष केंद्रित करतील. तर, मस्क हे उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करतील.
मस्क यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरच्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. ‘ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनोचे स्वागत करताना मला आनंद होत आहे! लिंडा या प्रामुख्याने व्यावसायिक कामकाजावर लक्ष केंद्रित करतील, तर मी उत्पादन डिझाइनवर लक्ष केंद्रित करेन,’ असे ट्वीट एलन मस्क यांनी केले. गुरुवारीच एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदी नव्या व्यक्तीची नियुक्ती होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे नवा सीईओ कोण होणार, यावर चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी लिंडा यांचे नाव जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
हे ही वाचा:
किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे नाव
खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार
फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!
फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!
कोण आहेत लिंडा याकारिनो?
लिंडा या प्रसारमाध्यमे उद्योगातील नावाजलेल्या व्यक्ती आहेत. त्या एनबीसी युनिव्हर्सलमध्ये २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी विविध नेतृत्वपदे भूषवली आहेत. सध्या त्या एनबीसी युनिव्हर्सलच्या सर्व जागतिक जाहिराती आणि भागीदारी व्यवसायांची जबाबदारी पाहतात. त्या ट्विटरच्या पहिल्या महिला सीईओ होणार आहेत. तसेच, तंत्रज्ञान क्षेत्राची पार्श्वभूमी नसणाऱ्याही त्या पहिल्याच सीईओ असतील. आतापर्यंतचे सर्व माजी सीईओ हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील होते.