तूर्की,सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ४,००० पेक्षा अधिक

तुर्कीचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी ट्विट करत मानले आभार

तूर्की,सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ४,००० पेक्षा अधिक

तुर्की आणि सिरिया मध्ये काल झालेल्या भूकंपानंतर ताबडतोब पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांना दिल्लीतील दूतावासात आपला शोक संदेश पाठवला. परराष्ट्र मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी तुर्कीचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांची भेट घेऊन त्वरित शोक व्यक्त केला. आणि सर्व प्रकारच्या मानवतावादी मदतीचे त्यांना आश्वासन देऊन पंतप्रधानांनी मदत रवाना पण केली. याच संदर्भात सुनेल यांनी ट्विट करत भारताचे आणि पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, खरा मित्र म्हणजे जो गरजेच्या वेळी उपयोगात येतो तो.

तूर्की आणि सिरिया देशांमध्ये आत्तापर्यंत चार हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला असून  १५,०००  पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यांखाली अनेक लोके अडकून पडल्याचे बोलले जात आहे. अति बर्फवृष्टीमुळे पडलेल्या इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम हळू हळू चालू आहे. काल झालेल्या भूकंपामुळे तुर्की आणि सिरिया व्यतिरिक्त आजूबाजूच्या प्रदेशातही भूकंपामुळे हानी झाली आहे.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

आत्तापर्यंत एकूण ४० वेळा भूकंपाचे हादरे या देशांना बसले असल्यामुळे बरेच नुकसान झाले आहे. तूर्की मध्ये सहा फेब्रुवारी ला झालेल्या भूकंपामुळे २,३१६ तर सिरियामध्ये १,९९९ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कितीतरी लोक बेघर झाले आहेत. खराब हवामानामुळे परिस्थिती जात बिकट आहे. ७.८ रिश्टर स्केल च्या भूकंपामुळे तूर्की ,सिरिया आणि आजूबाजूचे प्रदेश विस्थापित झाले आहेत. हे धक्के इतके तीव्र होते की, इमारतींचे ढिगारे च्या ढिगारे अजूनही पडले आहेत. हे ढिगारे काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू असताना बचाव कर्मचाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे.
दरम्यान , काल भारताने पाठवलेल्या तात्काळ मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले आहेत.

अंकारा,गाझियानटेप,दियार्बकीर, मालत्या, मुरदगी, यासह दहा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणांत विध्वंस झाला आहे. येथे १,७१० हुन अधिक इमारती कोसळायचे सांगितले जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Exit mobile version