‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचा प्रत्यय नुकताच तुर्की आणि सिरिया येथे झालेल्या बचाव पथकाला आला आणि सर्वानी पुन्हा एकदा याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. मागील आठवड्यात तुर्की , सीरिया , आणि आजूबाजूच्या देशात झालेल्या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत सुमारे ३०,००० मृत्यू झाले आहेत. बचाव पथके मोठ्या प्रमाणांत दिवस रात्र मेहनत घेऊन कोसळलेल्या इमारतींच्या ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. तुर्की आणि सीरियाच्या या विनाशकारी भूकंपामध्ये आत्तापर्यंत ३० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयन्त चालू असून यात काल चक्क १२८ तासांनंतर एका दोन महिन्यांच्या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा या चिमुकल्यासमोर हरल्याचे तेथील उपस्थित असलेल्या सर्वानी म्हंटले आहे.
A two-month-old baby was rescued from under the rubble 128 hours after the earthquake in #Turkey.
A miracle happened in Kahramanmaraş.
📰 Hurriyet pic.twitter.com/QUL5MkXV5W
— NEXTA (@nexta_tv) February 11, 2023
ढिगाऱ्याखालून काढले १२८ तासांनंतरही सुखरूप बाळ
तुर्कस्तानातील बचाव कार्यादरम्यान ‘देव तरी त्याला कोण मारी’चाच प्रत्यय सगळ्यांना आला. तुर्कीतील हाताय येथील शनिवारी या बचावकार्याच्या पथकाने चक्क दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शेकडो टन वजनाच्या या ढिगाऱ्याखालून मृत्यूवर मात केलेल्या या बाळाला बाहेर काढल्यावर बचाव पथकाच्या जवानांनी सुद्धा टाळल्या वाजवल्या. छोट्याशा या चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद बचाव आणि मदत पथकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पुढील काळजी घेण्यासाठी बाळाला इस्पितळात दाखल केले आहे.
हे ही वाचा:
मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली
राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले
फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय
महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय
मृत्यूचा आकडा २९ हजाराच्या पुढे
तुर्की आणि सिरिया मधील या भूकंपामध्ये मागील आठवड्यात सहा फेब्रुवारीला मोठा भूकंप झाला त्यानंतर पण भू कंपाचे धक्के बसत होते. या भूकंपामुळे हजारो घरे ,इमारती या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या आहेत. अजूनही कितीतरी नागरिक हे या ढिगाऱ्यांखाली अडकलेले असून तेथील प्रशासन युद्धपातळीवर मदत करून ढिगारे उपसून बचावकार्य करत आहे. या भूकंपात ८५ हारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपानंतर अनेक जण बचावले आहेत. पण त्यांच्या समोर आता अन्नधान्यांचे संकट उभे आहे. भूकंपामुळे अनेक जणांचा थंडी आणि भुकेने मृत्यू झाला आहे. दरम्यान, बचावपथके आणि प्रशासन यांच्याकडून मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.