डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!

आर्थिक विवंचनेत सापडल्यानंतर घेतला निर्णय

डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!

जगभरात डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड म्हणजे टप्परवेअर आर्थिक विवंचनेत सापडला आहे. टप्परवेअर कंपनीने कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरी जाहीर केली आहे. ही कंपनी अमेरिकेतील शेअर बाजारवार नोंदणीकृत असून अमेरिकेतील नियमांनुसार कलम ११ अंतर्गत या कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज सादर केला आहे.

जगप्रसिद्ध अशा टप्परवेअर ब्रँड कॉर्पोरेशनने त्यांच्या विक्रीत होत असलेली घट, बजारतील वाढती स्पर्धा बघता दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. जवजवळ वर्षभर टप्परवेअर ब्रँड आर्थिक संकटांचा सामना करत होते. कोविड- १९ साथीच्या काळानंतर कच्च्या मालाच्या किंमती, मजूर आणि मालवाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीचे मार्जिन कमी होत गेले. त्यातच या क्षेत्रात नव्या स्पर्धक कंपन्यांची भर पडू लागली आणि कंपनीला नफा कमवणे कठीण जाऊ लागले.

२०२० मध्येचं टप्परवेअर कंपनीला संकटांची चाहूल लागली होती. दरम्यान, जून महिन्यात या कंपनीने अमेरिकेतील त्यांचा कारखाना बंद केला होता. शिवाय १५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. पुढे कर्ज देणाऱ्या वित्त कंपन्यांसोबतची बोलणी अयशस्वी झाल्यानंतर या कंपनीने अखेर दिवाळखोरी जाहीर केली आहे.

हे ही वाचा:

पुढच्या वर्षी लवकर या… २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भावूक निरोप

लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले

डोनाल्ड ट्रम्प घेणार पंतप्रधान मोदींची भेट; मोदी ‘फँटास्टिक नेते’ म्हणत काढले गौरवोद्गार!

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट

किचनमधील साठवणुकीचे डबे यासाठी महिलांची पहिली आवड ही टप्परवेअरचं होती. अनेक दशके हे समीकरण जगभरात होते. टिकावू, हवाबंद, दिसायला आकर्षक आणि वेगवेगळे आकार, रंग यामुळे हे डबे लोकांची पसंद बनले होते. या कंपनीने या डब्यांच्या विक्रीची अत्यंत वेगळी अशी कल्पना राबवली होती. महिलांच्या मार्फत साखळीपद्धतीने याची विक्री व्हायची. त्यामुळे हे डब्बे घराघरात पोहचले होते.

Exit mobile version