परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीयांची जिंकली मने

परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. दक्षिण आशियातील देशांशी मैत्रिपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने या दौऱ्याला महत्त्व आहे. यावेळी आपल्या खणखणीत वाणीत पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण क्षेत्र, संस्कृती, खानपान, अर्थव्यवस्था, तरुणाई या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील भारतीयांना साद घातली. उपस्थित २१ हजार भारतीयांनी मोदी मोदी नावाचा गजर करत कुडोस बँक अरेना हे सिडनीतील भव्य सभागृह डोक्यावर घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत खास वैदिक मंत्रोच्चारात झाले. ढोल ताशे, संगीत नृत्य यांची रेलचेल यावेळी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस यांनीही मोदी यांच्या महत्तेचे कौतुक केले. नंतर ज्यांच्या भाषणाची प्रतीक्षा होती, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची घोषणा झाली तेव्हा सभागृहात एकच जल्लोष झाला.
पंतप्रधान म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध म्हणजे राष्ट्रकुल, क्रिकेट आणि करी या विषयांवर आधारित होते. नंतर याच संबंधांची लोकशाही, अनिवासी भारतीय आणि दोस्ती याच्या आधारे तुलना केली गेली. काही लोक ऊर्जा, अर्थव्यवस्था व शिक्षण या माध्यमातून या दोन देशातील संबंधांकडे पाहतात पण त्या पलिकडे जाऊन हे संबंध दृढ झालेले आहेत. हे संबंध परस्पर विश्वास आणि परस्परांचा आदर या पायावर आधारलेले आहेत. या दोन गोष्टी केवळ भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील परराष्ट्र संबंधांमुळे मिळालेल्या नाहीत तर तुम्ही सगळे भारतीय ऑस्ट्रेलियात राहता त्यामुळे मिळाल्या आहेत.

शेन वॉर्नचा उल्लेख

मोदी म्हणाले की, तुमची आणि आमची जगण्याची पद्धत वेगळी असेल पण त्याला योगाभ्यासाने आपण जोडू शकतो. क्रिकेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना जोडलेले आहेत. क्रिकेटमधील आपले संबंध ७५ वर्षांचे आहेत. पण महान गोलंदाज शेन वॉर्न यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा असंख्य भारतीयांनी शोक व्यक्त केला होता. जणू आमच्यातीलच कुणीतरी एक निघून गेला आहे, अशीच भावना होती.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना दोन जागा दिल्या तरी ते घेतील!

मिर्झापूरमध्ये हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची फसवणूक, लव्ह जिहादचा प्रकार

उद्धव ठाकरेंना दोन जागा दिल्या तरी ते घेतील!

केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव श्रीप्रकाश पांडेंनी दिली न्यूज डंकाला भेट

जागतिक अर्थव्यवस्थेवर भारताची छाप

मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेतही भारताची मान कशी उंचावलेली आहे, याचे वर्णन केले. ते म्हणाले की, जागतिक बँकेलाही विश्वास आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेतील संकटांना सामोरे जाण्याची ताकद भारतात आहे. अनेक देशातील बँकिंग यंत्रणा मोडकळीस आल्या किंवा संकटात सापडल्या पण भारतीय बँकांची स्थिती मात्र उत्तम आहे, त्याचे कौतुक होते आहे. गेल्या वर्षी आपण निर्यातीत विक्रम केला. आपली परकीय गंगाजळीही झेप घेते आहे. भारत डिजिटल क्षेत्रातही आघआडीवर आहे.

ब्रिस्बेनला दूतावास

ब्रिस्बेन येथे भारतीय दूतावास स्थापन करणार असल्याचेही मोदी यांनी आश्वासन दिले. ऑस्ट्रेलियातील तमाम भारतीयांची जी मागणी आहे, ती बऱ्याच काळाने पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी भारत माता की जयचा नारा दिला आणि उपस्थित भारतीयांनीही तेवढ्यात जोशात त्याला साथही दिली. नंतर मोदींनी उपस्थित भारतीयांना भेट देत सभागृह सोडले. त्यावेळीही मोदी यांची छबी टिपण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी भारतीयांची गर्दी जमली होती.

Exit mobile version