23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन

ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन

नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Google News Follow

Related

अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहत असून मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. अशातच तेथील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहते. तसेच जगभरात अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला आहे.

“हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. जमावाकडून हल्ले होत आहेत आणि बांगलादेशमध्ये लूट केली जात आहे, यामुळे संपूर्ण अराजकता माजली आहे. हे माझ्या काळात घडले नसते. कमला आणि जो यांनी जगभरातील आणि अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू आणि सामर्थ्याने शांतता परत आणू,” असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, “कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून आम्ही हिंदू अमेरिकन यांचेही संरक्षण करू. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू. माझ्या प्रशासनात, भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी आपली उत्तम भागीदारी मजबूत करू,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

“कमला हॅरिस तुमचे छोटे व्यवसाय अधिक नियम आणि उच्च करांसह नष्ट करतील. याउलट, मी कर कमी केले, नियमात कपात केली. इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था तयार केली. आम्ही ते पुन्हा करू, पूर्वीपेक्षा मोठे आणि चांगले. तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,” अशा शुभेच्छा ट्रम्प यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा : 

मुस्लिम पुरुषाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू महिलेशी केले लग्न

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम तैनात!

पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

दीपोत्सवाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने ईदसाठीच्या हिरव्या कंदिलाला विरोध केला असता का?

५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरीस आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे. त्यामुळे या निकालांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा