हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल

हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू

हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी येमेनमधील इराण समर्थित हौथी बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काळ काळापासून लाल समुद्रातील जहाजांवर हौथी बंडखोरांकडून हल्ले केले जात होते. या हल्ल्यांना आता अमेरिकेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेकडून लष्करी कारवाई करण्यात आली आहे. या एअरस्ट्राईकमध्ये सुमारे २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले थांबवावे म्हणून अमेरिकेने कठोर पावले उचलली आहेत. तसेच यापुढे हल्ला केला, तर तुमची अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी हौथी बंडखोरांना दिला आहे. त्यांनी इराणलाही इशारा दिला असून हुथी बंडखोरांना पाठिंबा देऊ नका, असे सुनावले आहे. जर इराणने अमेरिकेच्या विरोधात काही कारवाई केली तर अमेरिका याचे सडेतोड उत्तर देईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.

जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. “सर्व हौथी बंडखोर, तुमची वेळ संपली आहे आणि तुमचे हल्ले आजपासूनच थांबले पाहिजेत. जर तसे केले नाही, तर तुमच्यावर असा नरक कोसळेल जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल!” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

हौथी राजकीय ब्युरोने या हल्ल्यांना युद्ध गुन्हा म्हणून वर्णन केले आहे. आमचे येमेनी सशस्त्र दल तणाव वाढल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत, असेही एका निवेदनात म्हटले आहे. साना येथील रहिवाशांनी सांगितले की, हल्ल्यांमध्ये हौथी बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या एका इमारतीला फटका बसला. स्फोट हिंसक होते आणि त्यांनी परिसर भूकंपासारखा हादरवून टाकला.

हे ही वाचा : 

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कतालची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या

विराट कोहली आरसीबी संघात सामील

मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी…

वेंकटेश अय्यरला येतेय २३.७५ कोटी रुपयांचा दबाव

गेल्या दशकात येमेनचा बहुतांश भाग ताब्यात घेणाऱ्या हौथी बंडखोरांनी नोव्हेंबर २०२३ पासून जहाजांवर अनेक हल्ले केले आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला आहे. पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, २०२३ पासून हौथी बंडखोरांनी अमेरिकन युद्धनौकांवर १७४ वेळा आणि व्यावसायिक जहाजांवर १४५ वेळा हल्ले केले आहेत. हमास दहशतवाद्यांशी गाझा येथे इस्रायलच्या युद्धाबद्दल पॅलेस्टिनींशी एकता दर्शवण्यासाठी हे हल्ले केल्याचे हौथींचे म्हणणे आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अमेरिकन प्रशासनाने हौथींच्या किनाऱ्यावरील जहाजांवर हल्ला करण्याची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अमेरिकेच्या कृती मर्यादित केल्या होत्या.

मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी... | Dinesh Kanji | Nitesh Rane | Dongri |

Exit mobile version