अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा करणार आहेत. संभाव्य युद्धबंदीबद्दल अधिक माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, अंतिम करारामधील अनेक घटकांवर सहमती झाली असून अजून बरेच घटक बाकी आहेत.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, युक्रेनमधील युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणार आहे. अंतिम कराराच्या अनेक घटकांवर सहमती झाली आहे, परंतु बरेच काही शिल्लक आहे. हजारो तरुण सैनिक आणि इतर लोक मारले जात आहेत. प्रत्येक आठवड्यात दोन्ही बाजूंनी २,५०० सैनिकांचा मृत्यू होतो आणि हे आता संपायला हवे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी होणाऱ्या संपर्काची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील संघर्ष आणखी वाढला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि संघर्ष संपवण्यासाठी काम करत आहेत. अध्यक्षीय प्रचारादरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला होता की ते पदभार स्वीकारण्यापूर्वीच परिस्थिती सोडवू शकतात, ते म्हणाले होते की, रशियन आणि युक्रेनियन लोक मृत्यूला सामोरे जात आहेत. त्यांचे मरण थांबवावे असे वाटते आणि मी ते करेन.
हे ही वाचा :
मुख्यमंत्र्यांचा जखमी पोलिसांशी संवाद; कामाचे कौतुक करत बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
औरंग्याच्या कबरीच्या जागी धनाजी, संताजी, छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक उभारा
उत्तर प्रदेश: औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला ५ बिघा जमीन, ११ लाख रुपये देणार!
‘उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींपुढे लोटांगण घालून आले, नंतर पलटी मारली!’
गेल्या शुक्रवारी (१४ मार्च) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्पादक चर्चेनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची खूप चांगली शक्यता असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना विनंती केल्याचे ते म्हणाले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आवाहनाबद्दल सहानुभूती असल्याचे पुतिन यांनी रशियन टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या भाषणात म्हटले होते. त्यांनी शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले तर जीवनाची आणि सन्माननीय वागणूक मिळण्याची हमी दिली जाईल, असे पुतिन म्हणाले होते. दुसरीकडे युक्रेनने अमेरिकेच्या ३० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. परंतु, रशियाने अद्याप हा करार स्वीकारलेला नाही.