सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने तीन चिनी कंपन्यांना डिलीस्ट करण्याचा निर्णय मागे घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यादेश काढून तीन चिनी कंपन्या डिलीस्ट केलेल्या.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्वतःच्या सोशल नेटवर्कची सुरूवात करण्याची घोषणा केली. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या कॅपिटल हिलमध्ये घडलेल्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर ट्विटर आणि फेसबुकने ट्रम्प यांच्यावर बंदी घातल्यानंतर त्यांचे इंटरनेटवरील अस्तित्व पुन्हा मिळवण्यासाठी ते स्वतःचेच सोशल मिडिया नेटवर्क सुरु करत आहेत.

“ट्रुथ सोशल” ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (टीएमटीजी) च्या मालकीचे असेल. पुढील महिन्यात ‘विशेष पाहुण्यांसाठी’ त्याचे बीटा वर्जन म्हणजेच ट्रायल वर्जन सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऍपलच्या ऍप स्टोअरमध्ये हे प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे, असे ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे.

टीएमटीजीने सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड सेवा सुरू करण्याचा मानस आहे. ज्यामध्ये “डील किंवा नो डील” आणि “अमेरिका गॉट टॅलेंट” चे कार्यकारी निर्माता स्कॉट सेंट जॉन यांच्या नेतृत्वाखाली होईल. असे निवेदनात म्हटले आहे.

“बिग टेकच्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी मी ट्रुथ सोशल आणि टीएमटीजी तयार केले.” ६ जानेवारी रोजी यूएस कॅपिटल हिल येथे झालेल्या हल्ल्याला रोखण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकवर बंदी घालण्यात आलेल्या ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे.

“आपण अशा जगात राहतो जिथे तालिबानची ट्विटरवर मोठी उपस्थिती आहे, तरीही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना शांत केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे.” ते पुढे म्हणाले.

ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप ब्लँक चेक कंपनी डिजिटल वर्ल्ड एक्विझिशन कॉर्प (डीडब्ल्यूएसी) मध्ये विलीन होऊन टीएमटीजीला सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनी बनवेल. असे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

“ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे मूल्य $ ८७५ दशलक्ष च्या सुरुवातीच्या एंटरप्राइझ मूल्यावर आहे, ज्यात $ ८२५ दशलक्ष अतिरिक्त शेअर्सची संभाव्य अतिरिक्त कमाई (त्यांना दिलेल्या मूल्यांकनात) $ १.७ अब्ज पर्यंत कामगिरीवर अवलंबून आहे.” असे म्हटले आहे.

Exit mobile version