ट्रम्प पुन्हा सोशल मिडीयावर?

ट्रम्प पुन्हा सोशल मिडीयावर?

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने तीन चिनी कंपन्यांना डिलीस्ट करण्याचा निर्णय मागे घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यादेश काढून तीन चिनी कंपन्या डिलीस्ट केलेल्या.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचा स्वतःचा प्लॅटफॉर्म घेऊन येतील, अशी माहिती त्यांच्या एका सहकार्याने अमेरिकी न्यूज चॅनेल फॉक्स न्यूजला दिली. ६ जानेवारी २०२१ पासून डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटर, फेसबुक, युट्युब या आणि अशा सर्व प्रस्थापित समाज माध्यमांनी ‘ब्लॉक’ केले आहे.

६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या ‘कॅपिटॉल हिल’ अर्थात संसदेवर ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान काही आंदोलनकर्त्या समर्थकांना प्राण गमवावे लागले होते, तर अनेक पोलीस कर्माचारी आणि आंदोलनकर्ते जखमी झाले होते. या समर्थकांना ट्रम्प यांनीच चिथावले असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर त्यांचे ते विवादित भाषणही अनेक समाज माध्यमांद्वारे पसरवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच समाज माध्यमांनी ट्रम्प यांना बॅन केले आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा

राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल

राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा

ट्रम्प यांच्या २०२० सालच्या निवडणूक प्रचाराचे प्रवक्ते जेसन मिलर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पुन्हा एकदा समाज माध्यमांमधून आपल्यासमोर येतील आणि यावेळी ते स्वतःचाच नवा प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहेत असेही ते म्हणाले. ट्रम्प समाज माध्यमांमध्ये पुन्हा आल्याने ते या ‘खेळाचे नियमच बदलून टाकतील’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version