अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात मोदी ही अद्भूत व्यक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उधळली स्तुतीसुमने

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात मोदी ही अद्भूत व्यक्ती

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांना भारतीय समुदायाकडून मिळत असलेल्या समर्थनाविषयी चर्चा केली. पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत आणि माझ्यापेक्षा भारताचा कोणी चांगला मित्र नाही, असं ट्रम्प यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

हे ही वाचा:

आज होणार राजपथचे कर्तव्यपथ

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ट्रम्प म्हणाले, माझे भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खास संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत. ती एक अद्भुत व्यक्ती आहे.चांगले काम करत आहे. माझ्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंध सर्वात मजबूत झाले आहेत. असे घट्ट नाते ना बिडेन सरकारशी आहे ना ओबामा सरकारशी. अमेरिकेतही मला भारतीय समुदायाचा पाठिंबा मिळत आहे.

अमेरिकेत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक लढणार काही नाही याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, माझ्या निवडीमुळे बरेच लोक आनंदी असतील, परंतु काही लोक नाराज असतील. मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहे. मी निवडणुकीत उभे राहावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. माझी लोकप्रियता जास्त आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारावर केलेल्या सर्व प्रकारच्या सर्वेक्षणांमध्ये आणि सर्वेक्षणात मी आघाडीवर असतो. मात्र, ट्रम्प यांनी निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी बिडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला पक्षावर टीका केली. ट्रम्प म्हणाले, एफबीआयचा छापा हा सेटअप आहे. न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखे आहे. हा कट्टर डाव्या लोकशाहीवाद्यांचा हल्ला आहे. मी २०२४ ची निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा नाही. एफबीआयने ९ ऑगस्ट रोजी, माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या आलिशान पाम हाऊस आणि मार-ए-लिगो रिसॉर्टवर छापा टाकला हाेता.

Exit mobile version