फसवणुकीप्रकरणी ट्रम्प यांना ३५ कोटी डॉलरचा दंड

फसवणुकीप्रकरणी ट्रम्प यांना ३५ कोटी डॉलरचा दंड

कर्जदारांना फसवण्यासाठी स्वतःची मालमत्ता अधिक सांगितल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील न्यायालयाने ट्रम्प यांना शुक्रवारी ३५ कोटींचा दंड ठोठावला. तसेच, कोणत्याही न्यूयॉर्कमधील उद्योगाचे अधिकारीपद किंवा संचालकपद स्वीकारण्यासही बंदी घातली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांना हा जोरदार धक्का मानला जात आहे.

चांगल्या अटी-शर्तींवर कर्ज मिळावे, यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची मालमत्ता ३.६ अब्ज अमेरिकी डॉलर असल्याचे सांगून बँकांची फसवणूक केली होती, याप्रकरणी न्यूयॉर्कच्या ऍटर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांनी खटला दाखल केला होता. तर, हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका केली आहे.

तसेच, ट्रम्प आणि त्यांच्या कंपन्यांना न्यूयॉर्कमधील कोणत्याही आर्थिक संस्थांकडून तीन वर्षे कोणतेही कर्ज घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेतील महत्त्वाच्या बँकांमधून त्यांना कर्जे घेता येणार नाहीत. ट्रम्प ऑर्गनायझेशन २०२२मध्ये करफसवणुकीप्रकरणी दोषी आढळले होते.

हे ही वाचा:

आर अश्विनची तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

ट्रम्प यांची दोन मुले डॉन ज्युनिअर आणि एरिक या प्रकरणी दोषी आढलले होते. न्यायाधीशांनी त्यांना ४ कोटी डॉलर दंड भरण्याचे आदेश दिले होते. ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी सीएफओ एलेन वीसलबर्ग हेदेखील अन्य एका करफसवणूक प्रकरणात दोषी आढळले होते. तसेच, त्यांना १० लाख डॉलर दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. “डोनाल्ड ट्रम्प शेवटी त्यांची असत्य वागणूक आणि फसवणुकीसाठी दोषी ठरले आहेत. तुम्ही कितीही मोठे, श्रीमंत किंवा सामर्थ्यवान आहात असे तुम्हाला वाटत असले तरी कायद्याच्या वर कोणीही नाही,’ अशी प्रतिक्रिया जेम्स यांनी दिली आहे.

Exit mobile version